
मागील काही दिवसांपासून , बुद्धिबळविश्वात अनेक महत्वाच्या मैलाच्या दगड ठरतील , अश्या घटना घडत आहे . नागपूरची “दिव्या देशमुख’ वूमन ग्रँडमास्टर झाली . ग्रँडमास्टर ‘अभिजित कुंटे’ याला खेलरत्न ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झाला . “‘”‘संकल्प गुप्ता आणि मित्रभ गुहा ग्रँडमास्टर झाले, ज्यामुळे भारतीय ग्रँडमास्टरची संख्या ७२ झाली, तर महाराष्ट्रातील ग्रँडमास्टरची संख्या १० झाली,. या घडामोंडीबरोबर रौनक साधवानी हा गुणी खेळाडू १६ वर्षाखालील स्पर्धेत जागतिक जगजेत्ता झाला. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचे यश निश्चित वाखण्याजोगे आहे . प्रतिकूल परिस्थितीतून कुंटे कुटूंबियांनी आपल्या मुलाला बुद्धिबळात पुढे आणले. अभिजित कुंटे आणि मृणाली कुंटे नाशिकला बुद्धिबळ स्पर्धा खेळायला येत असतं. अभिजीतची यशोगाथा ” बिशप व नाईट ” या मासिकाची कव्हर स्टोरी (मुखपृष्ठावर छायाचित्र देऊन अंकाचा मुख्य विषय करणे ) त्याची माहिती देऊन करण्यात आली होती . रौनक साधवानी नाशिक येथे ग्रँडमास्टर विदित गुजराथीकडे प्रशिक्षण घेत होता, तेव्हा मलाही दोन दिवस विदितमुळे त्याला प्रशिक्षण देता आले, हे माझे सौभाग्याचं .

Nice information
Very nice 👍 sir.